जायकवाडी धरणाचे दरवाजे आज उघडणार, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाचे दरवाजे आज 11 वाजता उघडणार ; गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारापाणलोट क्षेत्रातून प्रतितास ७२ हजार ४०७ क्युसेस या क्षमतेने यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी आवक दाखल झाल्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मंगळवारी झपाट्याने वाढ झाली आहे.

कालपासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. अजूनही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज दि.29 सकाळी सात वाजेपर्यंत एकूण 92.31% जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे.

प्रकल्पात 100 टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो. त्यामुळे द्वार परिचलन आराखड्यानुसार प्रकल्पाचे दरवाजे आज 11 वाजता उघडण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे. तरी पैठण शहर तसेच गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावधानतेचा इशारा…..

काल दिनांक 28-09-2021 पासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सद्यस्थितीत देखील जोरदार पाऊसाचा ईशारा दिलेला असल्यामुळे आज दि. 29-09-2021 रोजी सकाळी 07.00 वाजेपर्यंत एकूण 92.31% जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे. प्रकल्पात 100 टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो. त्यामुळे द्वार परिचलन आराखड्यानुसार प्रकल्पाचे दरवाजे लवकरच उघडावे लागतील, अशी शक्यता आहे. तरी जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विद्यूत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे.

– पूर नियंत्रण कक्ष

जायकवाडी प्रकल्प, पैठण0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post