विरोधकांची सत्तेविना तळमळ चालली आहे -आ.अमोल मिटकरी

 आ.मिटकरी व आ.लंके यांचा नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने सत्कार


विरोधकांची सत्तेविना तळमळ चालली आहे -आ.अमोल मिटकरी    नगर - आघाडी सरकार हे तीन पक्षाचे असले तरी समन्वयातून निर्णय होत असल्याने जनतेचे प्रश्न सुटत आहे. या सरकारला कसलाही धोका नसून, विरोधक फक्त अफवा पसरविण्याचे काम करत आहेत. सत्तेविना त्यांची तळमळ चालली आहे. नगर जिल्ह्यातील तीनही पक्षाचे मंत्री असल्याने जिल्ह्यातील प्रश्नांना न्याय मिळत आहे. आमदार निलेश लंके यांनी तर कामाच्या माध्यमातून जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. सर्वांच्या सहकार्याने राज्याचा तसेच जिल्ह्याचा विकास साधला जाईल. विविध सामाजिक संस्थाही शासनाच्या कार्यात सहभाग देत आहेत. नंदनवन मित्र मंडळ राबवित असलेले उपक्रम समाजाभिमुख असल्याने त्यांच्या कार्यास आपणही सहकार्य करु, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

    आमदार अमोल मिटकरी व आमदार निलेश लंके यांचा हॉटेल पॅरेडाईज येथे नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  मंडळाचे मार्गदर्शक संजय जाधव, दत्ता जाधव, कपिल जाधव, राज जाधव आदि उपस्थित होते.

    याप्रसंगी आ.निलेश लंके यांनीही नंदनवन मित्र मंडळाच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. दत्ता जाधव यांनी मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शेवटी कपिल जाधव यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post