पंतप्रधान मोदींचा 'हा'गुण अधिक आवडतो; प्रीतम मुंडे

 मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण अधिक आवडतो; प्रीतम मुंडेचं सडेतोड विधान


बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र, मोंदीच्या या कृतीवर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं वेगळच म्हणणं आहे. मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुणच आपल्याला आवडत असल्याचं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे राठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी हे विधान केलं आहे. मोदींचा मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या सात वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांच्यावर टीका झाली. पण ते आपलं काम करत आहेत. आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत, असं मुंडे म्हणाल्या

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post