धक्कादायक...भाजपा नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयामध्ये महिलेचा विनयभंग

धक्कादायक...भाजपा नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयामध्ये महिलेचा विनयभंग मुंबई : मुंबईतील भाजपा महिला नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयामध्ये पार्टीच्या कार्यकर्त्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाच्या महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. मुंबईतील बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे.

बोरीवली पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल न घेतल्याचा महिलेचा आरोप आहे.

तक्रार न करण्यासाठी भाजपा नगरसेविकेने दबाव टाकल्याचा पीडित महिलेचा दावा आहे. तसेच, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि अंजली खेडकर यांच्या कार्यालयात आपल्याला मारहाण करुन बाहेर काढण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post