धक्कादायक...महिला सरपंचाच्या घरावर लोकायुक्तांनी टाकला छापा...आढळली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती...

धक्कादायक...महिला सरपंचाच्या घरावर लोकायुक्तांनी टाकला छापा...आढळली 11 कोटींची संपत्ती...  रीवा - मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील बैजनाथ गावच्या महिला सरपंचाच्या घरी लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यात संबंधित महिलेच्या नावावर ११ कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. 

गावच्या महिला सरपंच सुधा सिंह यांचा अलिशान बंगला असून कोट्यवधी रुपये किंमतीची वाहने आहेत. तसंच सोने चांदीचे दागिने, जमीन यासह क्रशर, जेसीबी यांसारखी मशिन्ससुद्धा आहेत. या सगळ्या मालमत्तेची अंदाजे किंमत ११ कोटी रुपयांहून जास्त आहे.

सुधा सिंह यांनी एक एकर आवारात अलिशान बंगला बांधला असून त्यात स्विमिंग पूलसुद्धा तयार करण्यात आला आहे. लोकायुक्त या प्रकरणाची चौकशी करत असून आतापर्यंत २० हून अधिक जमिनी, वाहने, अलिशना बंगला, क्रशर, सोने, चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराची तक्रार मिळाल्यानंतर लोकायुक्तांनी न्यायालयातून सर्च वॉरंट घेतलं होतं. यामध्ये आतापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस आली आहे. यात आणखी काही संपत्ती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post