खा.विखे पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांची भेट, मतदारसंघात ६० वर्षापुढील नागरीकांना चष्मा, श्रवणयंत्र, काठी वाटप,

 खा.विखे पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांची भेट, मतदारसंघात नगर : खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी नवी दिल्ली येथे   केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री. वीरेंद्र कुमारजी यांची भेट घेऊन त्यांच्या विभागांतर्गत कार्यरत असणारी वयोश्री योजना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. यासोबतच डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल येथे कार्यरत  असलेले DDRC सेंटर आणि हॉस्पिटलच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची त्यांना माहिती दिली. यावेळी येत्या महिन्याभरात वयोश्री योजनेचा कॅम्प अहमदनगर जिल्ह्यात घेण्याचे नियोजन केले.या कॅम्प मध्ये ६० वर्षापुढील नागरीकांना चष्मा, श्रवणयंत्र, काठी इत्यादी साहित्य वाटप केले जाईल. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post