जेऊर येथील कर्डिले यांचे आंदोलन फक्त नौटंकी

 शिवसेना नेते गोविंद मोकाटे यांचा आरोप : जेऊर येथील कर्डिले यांचे आंदोलन फक्त नौटंकी 


 जेऊर-  ज्यांनी आयुष्यभर राजकीय जीवनात कटकारस्थाने करून निष्पाप  लोकांना जेलमध्ये टाकण्याचे पाप केले ते शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये कसे जाणार ? शेतकऱ्यांविषयी त्यांचे प्रेम पुतणामावशीचे असुन सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणारे आज शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची अशोभनीय भाषा करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते व माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी केला .
जेऊर येथील महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर आरोप केले होते . त्या आरोपांना ऊत्तर देण्यासाठी मोकाटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की ,
जेऊर महावितरण कंपनी येथे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेले आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी असल्याचा आरोप माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
     माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कर्डिले यांनी राज्य सरकारवर टीका करत महावितरण कंपनीत गलथान कारभार सुरू असून शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी तयार असल्याचे सांगितले होते.
     त्याबाबत माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कर्डिले यांचे आंदोलन नौटंकी असून गोरगरीब जनतेला तसेच दुसऱ्यांना खोट्या गुन्ह्यात  अडकवून जेलमध्ये पाठवणारे काय जेलमध्ये जाणार? ते जेलमध्ये नक्की जातील परंतु सामाजिक आंदोलनातून नव्हे तर त्यांच्या इतर कर्तृत्वाने जातील. सत्तेत असताना पंचवीस वर्षात मंत्रालयात शेतकऱ्यांबद्दल 'ब्र' शब्द न उच्चारणा-यांना आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. दूधवाले आमदार म्हणून घेणाऱ्यांनी दुधाचा प्रश्न सोडविला का? दूध प्रक्रियेचा एखादा उद्योग सुरू केला का? उलट दूध संघ बंद पाडला.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post