मनपा शिक्षकांना राज्य शासनाकडून १०० टक्के वेतन मिळावे यासाठी सहकार्य

 मनपा शिक्षक संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार.


मनपा शाळांना आमदारांकडून इ-साहित्य भेट.अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या निधीतून अहमदनगर महानगरपालिकेच्या शाळांना स्मार्ट टिव्ही व ई - लर्निंग सेट वाटप केले आहेत.त्यामुळे अहमदनगर मनपा शिक्षक संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अहमदनगर मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण,नपा व मनपा शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस अरुण पवार, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब कबाडी,जिल्हा कोषाध्यक्ष अमोल बोठे,मनपा शिक्षक संघाच्या अध्यक्षा मनिषा शिंदे, कार्याध्यक्ष अक्षय सातपुते,शिक्षक संघाचे नेते शशिकांत वाघुलकर,मुख्याध्यापक विजय घिगे उपस्थित होते.

मनपा शाळेतील गोरगरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या ई-लर्निंग साहित्याचा मोठा उपयोग होणार आहे,असे पर्यवेक्षक जुबेर पठाण म्हणाले.

यावेळी अरूण पवार यांनी मनपा शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमांची आमदार संग्राम जगताप यांना माहिती दिली.तसेच नगरपालिका व महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना राज्य शासनाकडून १०० टक्के वेतन मिळावे यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याला आमदार संग्राम जगताप यांनी मार्गदर्शन व सहकार्य करावे,असे आवाहन केले.

मनपाच्या शाळांना सर्वोतोपरी मदत केली जाईल.तसेच नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना १०० टक्के वेतन राज्य शासनाकडून होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करु, असे संग्राम जगताप म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post