आय.टी.पार्कमध्ये आणखी कंपन्या आणण्याचा प्रयत्न, आरोप करणारे माझ्या दृष्टीने अदखलपात्र : आ.संग्राम जगताप

आय.टी.पार्कमध्ये आणखी कंपन्या आणण्याचा प्रयत्न, आरोप करणारे माझ्या दृष्टीने अदखलपात्र : आ.संग्राम जगतापआयटी पार्कवरून  काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गुरूवारी आ. जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आयटी पार्कच्या इमारतीत जाऊन तेथील परिस्थिती माध्यमांसमोर आणली होती. आ. जगताप यांनी आयटी पार्क सुरू केल्याचे बनावट चित्र उभे केले असल्याचेही त्यांनी म्हटले होते.  त्या पार्श्वभूमीवर आ. जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत एकूण परिस्थितीची माहिती दिली.  यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते आदी उपस्थित होते.

आयटी पार्क येथे जाऊन तेथे असलेल्या सर्वांना धीर देऊन आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगणार असल्याचे सांगून, आ. जगताप म्हणाले, आयटी पार्कसाठी एमआयडीसीमध्ये 2000 साली इमारत उभी केली.तेंव्हापासून ती तशीच पडून होती. तेथे उद्योग आणण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. अखेर एमआयडीसीने त्यावरील आयटीचा शिक्का दूर करत इतरांना तेथे भाडेपट्टीने जागा दिल्या. मात्र आयटी पार्क सुरू करण्यासाठी मी 2016 पासून प्रयत्नशील होतो. अथक प्रयत्नानंतर स्टार्टअप सुरू करणार्‍यांना तेथे येण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्यासाठी खासगी खर्चातून इमारतीची डागडुजी केली. 19 वर्षे पडून असलेल्या इमारतीचे मोठे नुकसान झाले होते. विजेची देखील तेथे सुविधा राहिली नव्हती. ते सर्व आम्ही करून दिले. नगरचेच असलेले पण पुणे व अन्य ठिकाणी स्टार्टअप सुरू करणार असलेल्यांना नगरमध्ये निमंत्रित केले. या निमित्ताने तेथे नगरच्या युवकांना रोजगार मिळाला. 

इमारत बंद असताना त्याकडे कोणीही फिरकले नाही. आता तेथे काहीतरी रोजगार देण्याचे काम सुरू असताना काहींना पहावत नाही. तेथे जाऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत, गोंधळ घालत दहशत माजविली जात आहे. तेथे आलेल्यांना पळवून लावण्याचे हे काम करत आहेत. मात्र असे करून कोणीही मते देत नसतात. त्यासाठी कर्तृत्त्व सिद्ध करावे लागते. मात्र तेथे काम करणार्‍या सर्वांच्या पाठीशी आम्ही आहोत. एवढेच नव्हे तर कोरोनाची लाट नसती तर आणखी येथे नवीन कंपन्या आलेल्या दिसल्या असत्या. भविष्यातही त्या येणार आहेत.

 तेथे जाऊन गोंधळ करणारे उठसुट माझ्यावर आरोप करत असतात. आम्ही कधीच त्यांच्या आरोपांना भीक घातली नाही. त्याकडे कधी ढुंकुनही पाहिले नाही. मात्र आयटी पार्क संदर्भात करण्यात आलेले आरोप नगरच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. कोरोनामध्ये लाखोंच्या नोकर्‍या गेल्या असताना येथे मात्र रोजगार मिळवून देण्यात येत आहे. या चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम काही करत आहेत. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post