शिवसेनेच्या बड्या मंत्र्याला 10 लाखांच्या खंडणीसाठी फोन...बदनामी करण्याची धमकी....

शिवसेनेच्या बड्या मंत्र्याला 10 लाखांच्या खंडणीसाठी फोन...बदनामी करण्याची धमकी....


 

रत्नागिरी  : मुंबईतील जयहिंद चॅनेलमधून बोलत असल्याचं सांगत, एका तरुणाने महाविकास आघाडी सरकारमधील  एका बड्या मंत्र्याला 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनं दहा लाख रुपये न दिल्यास बदनामी करेन, अशी धमकी दिली आहे. तसेच आरोपीनं संबंधित मंत्र्याबाबत अश्लील मजकूर देखील व्हॉट्सअॅपला पाठवून बदनामीचा इशारा  दिला आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात मुंबईतील प्रदीप भालेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केलं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रदीप भालेकर याने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत   आणि त्यांचे भाऊ किरण सामंत यांना आक्षेपार्ह मजकूर पाठवून बदनाम करण्याची धमकी दिली आहे. तसेच समाजात होणारी बदनामी टाळायची असेल, तर लवकरात लवकर दहा लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना 26 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post