नगरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा एकत्रित जल्लोष, महिला बालकल्याण पदाधिकारी निवड बिनविरोध

नगरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा एकत्रित जल्लोष, महिला बालकल्याण पदाधिकारी निवड बिनविरोधनगर - महापालिकेत  महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक आज पीठासीन अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी पुष्पा बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांना सूचक नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, नगरसेविका सुरेख कदम व अनुमोदन कमळ सप्रे, शांताबाई शिंदे होत्या. राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीना चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर सूचक म्हणून नगरसेविका दीपालीताई बारस्कर व अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभा बोरकर होत्या. 

निवडणूक प्रक्रियेत सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ही दोन्ही पदे बिनविरोध जाहीर करण्याची औपचारिकता बाकी होती. ती जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज पूर्ण केली.  निवड जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळला.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post