किरण काळेंचे आरोप सत्र चालूच...आता बाजार समितीच्या मुद्दयावरुन गंभीर आरोप

 मुख्य बाजार नेप्तीला हलवण्याचा आमदारांचा सोयऱ्यांच्या मदतीने डाव - किरण काळे ; 

शहराचे नुकसान होऊ देणार नाही, काँग्रेस व्यापाऱ्यांच्या पाठीशी प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मुख्य बाजार हा नेप्तीच्या उपबाजारात हलविण्याचा शहराच्या आमदारांचा सोयऱ्यांच्या मदतीने डाव शिजत आहे. यामुळे व्यापारी, हमाल, मापाडी, किरकोळ विक्रेते, व्यावसायिक हे रस्त्यावर येतील. काँग्रेस हे कदापि होऊ देणार नाही. त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी बाजार समितीवर बुलडोजर फिरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या नीच कृत्याला आडवा पाय घालत विरोध करण्याचे काम मी करणार आहे, अशी जाहीर भूमिका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी घेतली आहे. 


बाजार हलविण्यास शहराच्या अर्थचक्रावर याचे अन्यथा दूरगामी नकारात्मक परिणाम होतील. यामुळे शहराचे नुकसान होऊ नये यासाठी काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.   बाजार समिती जरी तालुक्याचा विषय असला तरी देखील त्या ठिकाणी व्यापार करणारे बहुतांशी व्यापारी, हमाल, मापाडी हे नगर शहरातील आहेत. नगर शहरातील प्रत्येक घटकाचे हित जोपासणे ही शहर काँग्रेसची जबाबदारी आहे. भुसार बाजार, भाजीपाला बाजार, फळ बाजार, फुलबाजार, चिंच बाजार, मिरची मार्केट या ठिकाणी शेकडो व्यापारी, हमाल, मापाडी आपलं पोट भरतात. मात्र आमदारांना त्यांच्या सोयऱ्यांच्या मदतीने हा बाजार बुलडोझर लावून जमीनदोस्त करत या सगळ्यांना नेप्ती उपबाजारात हलवायचं आहे. 


यातून कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्याचा यांचा डाव आहे. नेप्तीला कांदा बाजार असून त्याठिकाणी आज देखील गाळे विकले गेलेले नाहीत. यामुळे मोठ्या संख्येने ग गाळे आजही रिकामे आहेत. मुख्य बाजार समितीतील व्यापाऱ्यांना तिकडे जायला भाग पडून तिकडचे रिकामे गाळे विकून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटण्यासाठी यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. मुख्य बाजार समिती आवारातील गाळ्यांवर बुलडोजर चालवून याठिकाणी परत नवीन गाळे बांधायचे. हे गाळे घेण्यासाठी बाजारात आपल्या पंटर लोकांना एजंट म्हणून सोडायचं आणि यातून कोट्यवधी रुपयांची लूट करण्याचा या मंडळींचा डाव आहे, असा घणाघाती आरोप किरण काळे यांनी केला आहे. 

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post