आश्चर्यच....चक्क लहान बाळासारखा रडणारा अनोखा पक्षी...पहा व्हायरल व्हिडिओ

आश्चर्यच....चक्क लहान बाळासारखा रडणारा अनोखा पक्षी...पहा व्हायरल व्हिडिओ नवी दिल्ली -  प्राणीसंग्रहालयातील एक पक्षी चक्क बाळासारखा रडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. पक्ष्याचा आवाज ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट ठरला असून अनेकांना तो प्रचंड आवडला आहे. 


सिडनीच्या टॅरोंगा प्राणीसंग्रहालयातील  हे दृश्य आहे. या प्राणीसंग्रहालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पक्षी ओरडताना दिसत आहे. पण एखाद्या पक्ष्याच्या ओरडण्यासारखा त्याचा आवाज नाही तर चक्क एका लहान बाळाचा आवाज आहे. तो जेव्हा ओरडतो तेव्हा बाळाचा आवाज येतो. म्हणजेच बाळाच्या रडण्याचा आवाज या पक्ष्याच्या गळ्यातून बाहेर पडतो आहे. lyrebird असं या पक्ष्याला म्हटलं जातं. जो वेगवेगळे आवाज काढण्यात म्हणजे आवाजाची नक्कल करण्यात तरबेज असतो. हा पक्षी आवाज बरोबर लक्षात ठेवतो आणि तसा हुबेहुब आवाज काढण्याचा सरावही करतो.  या पक्ष्यानेही कदाचित असाच बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला असावा आणि अगदी तसाच आवाज तो काढतो आहे अशी माहिती प्राणीसंग्रहालयाच्या सुपरवायजरने दिली आहे.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post