लसीकरण केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाणपुणे :  पुण्यात एका महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याची लाजिरवाणी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणाती सविस्तर माहिती समोर आलेली नाही. कदाचित या प्रकरणात महिला सरपंचाची चूकही असू शकते. पण लसीकरण केंद्रावर चार चौघात कायदा हातात घेऊन महिलेला मारहाण करणं हे आक्षेपार्हच आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने महिला सरपंचाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित घटना ही पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली आहे. संबंधित घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मारहाण झालेल्या महिला सरपंचाचं नाव गौरी गायकवाड असं आहे. तर मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव सुजित काळभोर असं आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post