किरीट सोमय्या गुरुवारी नगरमध्ये...‘या’ साखर कारखान्याच्या विक्रीबाबत ‘ईडी’कडे तक्रार

 किरीट सोमय्या गुरुवारी नगरमध्ये..नगर:   जिल्ह्यातील पारनेर साखर कारखाना विक्रीच्या चौकशी प्रकरणी कृती समितीच्या वतीने थेट 'ईडी'कडे चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. कारखान्याच्या शेतकरी सभासदांसह इतर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या हे गुरुवारी २३ तारखेला पारनेरमध्ये येणार असल्याची माहिती कृती समितीचे रामदास घावटे व बबनराव कवाद यांनी दिली. 

किरीट सोमय्या हे गुरूवारी  क्रांती शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड युनिट भेट देणार आहेत. त्यानंतर ते पारनेर येथील शेतकरी सदस्य, कामगार, ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.पारनेर कारखाना विकत घेणारी खासगी कंपनी क्रांती शुगर यांच्याकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना, सुमारे ३२ कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला होता. राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबविली होती. तर, पारनेर विकत घेण्यासाठी वापरलेले २३ कोटी रुपये उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडिया यांच्याकडून उसणे घेण्यात आल्याचे दाखविण्यात आलेले आहे. तर, उर्वरीत ९ कोटी रुपये अक्षर लॅण्ड डेव्हलपर्स यांच्याकडून घेण्यात आलेले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे. असे ही घावटे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post