खा.विखे यांचा शेवगाव पाथर्डीतील पूरग्रस्त गावांना भेट, केंद्राकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही

 खा.विखे यांचा शेवगाव पाथर्डीतील पूरग्रस्त गावांना भेट, केंद्राकडून मदत मिळवून देण्याची ग्वाहीपाथर्डी :अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.शेतीसह जनावरांची प्रचंड जीवित हानी  झाली आहे. अनेकांचे शेती अवजारे, संसार उपयोग वस्तू पाण्यात वाहून गेल्याने अनेक परिवार उघड्यावर आले आहेत.अशा संकटात आपण सोबत आहोत.केंद्र शासनाच्या योजनेतून पूरग्रस्तांसाठी मदत दिली जाईल असे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे यांनी केले.

मुखेकरवाडी,कोळसांगवी येथे खासदार डॉ सुजय विखे  यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,गोकुळ दौंड,डॉ मुंत्यजय गर्जे ,जि प सदस्य राहुल राजळे,अजय रक्ताटे,अनिल बोरुडे ,बंडू बोरूडे,प्रतिक खेडकर, मंगलताई कोकाटे, पांडूरंग सोनटक्के,प्रांत अधिकारी देवदत्त केकाण,तहसीलदार शाम वाडकर,तालुका कृषी अधिकारी सुधीर शिदे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

शेकडो घरेे पाण्याखाली गेली.असंख्य मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला. अनेक छोटे बंधारे फुटल्याने नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या. ऊस , कापूस , तुर , उडीद , कांदा, यासह भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी विखे यांनी संवाद साधला.तसेच कोळ सांगवी येथील पुराच्या पाण्यात वाहून जात असताना बचावलेल्या वयोवृद्ध भगवान घुले यांची घरी जाऊन भेट घेतली.केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतील त्यातून पूरग्रस्तांसाठी जी काही भरीव मदत देता येईल का त्यासाठी अधिकऱ्यांन महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post