किर्तनकार ताजोद्दीन यांचे किर्तनसेवा सुरु असतानाच निधन...वारकरी संप्रदायावर शोककळा...video

किर्तनकार ताजोद्दीन यांनी किर्तनसेवा सुरु असतानाच निधन...वारकरी संप्रदायावर शोककळा... धुळे : जामदे (ता.साक्री) येथे साेमवारी रात्री किर्तनसेवा करीत असताना ह.भ.प ताजोद्दीन शेख महाराज यांना हदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापुर्वीचे त्यांचे निधन झाले. शेख बाबा यांच्या निधनाने वारकरी बांधव शाेकसागरात बुडाले.  

शेख बाबा हे हिंदू देव-देवतांचे किर्तन करीत असतं. त्यांना मानणारा चाहता वर्ग खूप माेठा आहे. राज्यासह देशातील विविध राज्यात त्यांनी किर्तनसेवा केली आहे. युवकांना संघटित राहण्याचे आवाहन ते नेहमी करीत असे. 

ते औरंगाबाद येथे राहत असतं. मराठी आणि हिंदी या भाषांसह त्यांचे संस्कृतवर प्रभुत्व होते. त्यांच्या निधनाने वारकरी बांधव शाेकसागरात बुडाले.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post