जनतेला दंडुका आणि पवारांना संरक्षण कधी पर्यंत ?

 

जनतेला दंडुका आणि पवारांना संरक्षण कधी पर्यंत ? मुंबई : कर्जत जामखेडचे आ.रोहित पवार यांनी खर्डा किल्ला परिसरात सर्वात मोठा भगवा ध्वज बसविण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी स्वराज्य ध्वज यात्रा सुरु केली असून या यात्रेवेळी प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. करोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गर्दी जमवणार्‍या कार्यक्रमांना आवर घालण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी आ.रोहित पवार यांच्या यात्रेला हजारोंची गर्दी उसळल्याचे दिसून येते. यावरुन भाजपने आ.पवारांवर निशाणा साधला आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्यानंतर आ.सदाभाउ खोत यांनीही पवारांच्या स्वराज्य यात्रेवरुन थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. 


जनतेला दंडुका आणि पवारांना संरक्षण कधी पर्यंत.?

 स्वराज्य_ध्वज' अभियानाअंतर्गत कर्जत जामखेड चे आमदार कोरोना नियमाचे उल्लंघन करून  गर्दी जमवित आहे.  जबाबदारी आठवून मुख्यमंत्री आता कारवाई करणार का.?  असा सवाल खाते यांनी उपस्थित केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post