आ.सदाभाऊ खोत यांच्या मुलाची दहशत, स्वाभीमानीच्या पदाधिकार्‍याला घरात घुसुन मारहाण

आ.सदाभाऊ खोत यांच्या मुलाची दहशत, स्वाभीमानीच्या पदाधिकार्‍याला घरात घुसुन मारहाण


 

इस्लामपूर :  माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर खोत याने आपल्या साथीदारांसह तांबवे (ता. वाळवा) येथील स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी रात्री ९ च्या सुमारास घडला.


रविकिरण राजाराम माने (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कासेगाव पोलिसांनी सागर सदाभाऊ खोत,अभिजित भांबुरे, स्वप्नील सूर्यवंशी (तिघे रा. इस्लामपूर) आणि सत्यजित कदम (शिराळा) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post