लग्नात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीचा बदला तरुणाचा खून

 पाथर्डी : तालुक्यातील खेर्डे येथे दोन वर्षांपूर्वी लग्नात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर चौघांनी चाकू हल्ला ...पाथर्डी : तालुक्यातील खेर्डे येथे दोन वर्षांपूर्वी लग्नात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर चौघांनी चाकू हल्ला करीत त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र रामकिसन जेधे (वय ३३) असे मयताचे नाव आहे.

खून केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रशांत बबन शेळके, किशोर बाबासाहेब शेळके, प्रवीण बबन शेळके, बबन जगन्नाथ शेळके (सर्व रा. खेर्डे) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण करत आहेत.

प्रशांत बबन शेळके व राजेंद्र रामकिसन जेधे यांच्यात सुमारे दोन वर्षांपूर्वी गावातील लग्नात नाचण्याच्या कारणावरून मारामारीचा प्रकार घडला होता. त्या घटनेचा राग मनात धरून शेळके व त्यांच्या साथीदारांनी शुक्रवारी राजेंद्र जेधे यांच्या घराच्या पडवीच्या बाहेर जेधे यांस पकडले. शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रशांत बबन शेळके याने धारदार चाकूने जेधे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस वार केला. त्यानंतर जेधे यांना नातेवाइकांनी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचांरासाठी दाखल केले. मात्र, जखम गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यास नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक वाघ, सहायक पोलीस निरीक्षक कायंदे, गोपनीय विभागाचे भगवान सानप आदींनी घटनास्थळी भेट दिली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post