नगर हळहळले...केडगावात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

 नगर हळहळले...केडगावात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्यानगर-  केडगाव येथील एकाच कुटुंबातील 3 जण मृतावस्थेत आढळून आले आहेत. आई वडीलांनी दहा वर्षाच्या मुलीला गळफास देवून नंतर स्वत:ही गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यात आईवडीलांसह चार वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर ठुबे मळा येथील फाटक कुटुंबात हा प्रकार घडला. संदिप दिनकर फाटक, (वय 40), किरण संदिप फाटक (वय 32), मैथिली संदिप फाटक (वय 10 ) अशी मयतांची नावे आहेत. फाटक हे व्यावसायिक होते. परंतु, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. सकाळी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post