करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार

 करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम वाढणारकरुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी 18 तारखेला होणार. करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार. करुणा शर्मा यांना ॲट्रॉसिटी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा अंबाजोगाईचं जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली होती. आपल्याच प्रकरणी करुणा शर्मा यांना जामीन मिळावा म्हणून अंबाजोगाईच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी आज होणार होती, मात्र या प्रकरणात फिर्यादी आणि तपास अधिकारी यांचा जवाब नोंदविला गेला नाही, म्हणून न्यायालयानं या प्रकरणावरची सुनावणी अठरा तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. 20 सप्टेंबरपर्यंत करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढच्या 18 तारखेला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post