भर मध्यरात्री दुचाकीवर फिरत माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंनी दिला पूरग्रस्तांना दिलासा...

 भर मध्यरात्री दुचाकीवर फिरत माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंनी दिला पूरग्रस्तांना दिलासा...

जेऊर बाईजाबाई येथे मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली पुर परिस्थितीची पाहणी
दुचाकीवर प्रवास करीत वाड्या-वस्त्यांवर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद

पुरातून व चखलातुन पायवाट काढीत पूरपरिस्थितीच्या ठिकाणी मा.मंत्री झाले दाखल

व्यावसायिकांना १ लाख रुपयांची मदत व शेतकऱ्याला एकरी ५० हजाराची मदत करण्याची केली सरकारकडे मागणी

अहमदनगर प्रतिनिधी - नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई  परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला.स्थानिकांच्या मते ढगफुटीसदृश पाऊस होता यामुळे जेऊर परिसरातील 12 वाड्या वस्त्यांवर पुराच्या पाण्याने अहकार माजवला त्यामध्ये वाड्या वस्त्यांना जोडणारे पूल वाहून गेले याच बरोबर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच जेऊर बाईजाबाई गावामध्ये व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानात मध्यरात्री पुराचे पाणी घुसले त्यामध्ये व्यावसायिकाच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये व्यापारी व शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या वतीने व्यावसायिकांना १ लाख रुपयांची मदत व शेतकऱ्याला एकरी ५० हजाराची मदत करण्याची केली मागणी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळी केली. मा.मंत्री कर्डिले यांनी जेऊर बायजाबाई येथे प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर तसेच घराघरात जाऊन दुचाकीवरून प्रवास करीत शेतकऱ्यांचा समवेत संवाद साधला व शेतकऱ्यांना धीर दिला तसेच पुरातून व चिखलातुन पायवाट काढत पूर परिस्थितीचा ठिकाणी दाखल होऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी विनंती केली.यावेळी त्यांच्या समवेत सरपंच अण्णासाहेब मगर, उपसरपंच श्रीतेश पवार,मधुकर मगर,विकास कोथंबिरे, गणेश तवले, बंडू पवार,सुनील ससे,आदिनाथ बनकर,बाप्पू तवले,गणेश शिंदे,नंदू तवले,सागर मगर,गौरव बनकर,अनिल ससे,राम पानमळकर,मयूर पाखरे,दिनेश बर्डे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post