बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद.... video

 बेकायदेशिररित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुसे कब्जात बाळगणारा आरोपी जेरबंद.... video

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.अहमदनगर -प्रतिनिधी विक्रम बनकर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र शोध मोहिम आयोजित करण्यात आलेली असून सदर मोहिमेअंतर्गत अवैध अग्निशस्त्रांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमण्यत आलेले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रांची गोपनिय माहिती घेत असताना दिनांक २७/०९/२०२१ रोजी सकाळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके  यांना माहिती मिळाली कि, एक पिवळसर रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट घातलेला व शरिराने सडपातळ असलेला इसम बेकायदेशिररित्या आपले कब्जात गावटी कट्टा बाळगून अहमदनगर-औरंगाबाद रोड वरील ईमामपूर घाट येथील बंद असलेल्या लेमन ट्री हॉटेल समोर थांबलेला आहे, आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहीतीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार नानेकर, पोलीस हेड कॉन्टेबल भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेटेकर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, महिला पोलीस कॉन्टेबल सोनाली साठे अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयातून निघून नगर-औरंगाबाद रोडवरील ईमामपुर घाट येथील बंद असलेल्या लेमन ट्री हॉटेल या ठिकाणी जावून सापळा लावुन माहीती मिळालेल्या वर्णनाच्या इसमाचा शोध घेत असताना लेमन ट्री हॉटेल समोर रस्त्याचे कडेला एक इसम संशईतरित्या आजूबाजूस टेहळणी करीत उभा असलेला दिसला.

पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यास घेराव घालून ताब्यात घेवून त्यास पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव, पत्ता सागर महेन्द्र त्रिभूवन, वय- २० वर्षे, रा. वडगाव कोल्हाटी, ता. जि. औरंगाबाद असे असल्याचे सांगीतले. त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) व दोन जिवंत काडतूसे असा एकूण ३० हजार ६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. वरील नमुद इसम नामे सागर महेन्द्र त्रिभूवन, वय २० वर्षे, रा. वडगांव कोल्हाटी, ता. जि. औरंगाबाद हा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे बेकायदेशिरित्या आपले कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोहेकॉ विजयकुमार बाळासाहेब वेठेकर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन भारतीस हत्यार कायदा कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहेत.


वरील नमुद आरोपी विरुध्द यापुर्वी वाळुंज एमआयडीसी पो.स्टे.औरंगाबाद येथे गुरनं. २८९/२०२१ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४


सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post