‘जिओ फोन नेक्स्ट’, केवळ 500 रुपयांमध्ये बुकिंग....

 ‘जिओ फोन नेक्स्ट’, केवळ 500 रुपयांमध्ये बुकिंग.... रिलायन्स जिओने   ‘जिओ फोन नेक्स्ट’ हा फोर-जी स्मार्ट फोन आणला असून बुधवार, 1 सप्टेंबरपासून त्याचे बुकिंग करता येणार आहे. फोनच्या किमतीच्या दहा टक्के म्हणजे केवळ 500 रुपयांमध्ये हा फोन बुक करता येणार आहे.

10 सप्टेंबर रोजी हा फोन लाँच होणार आहे. यामध्ये पाच हजार रुपये आणि सात हजार रुपये किमतीची दोन प्रकारची मॉडेल असणार आहेत. गुगलच्या सहकार्याने जिओने हा स्मार्टफोन बनवला असून पुढील सहा महिन्यांत तब्बल पाच कोटी फोनच्या विक्रीचे टार्गेट ठेवले आहे. तसेच ग्राहकांना कर्जरूपाने हा फोन घेता यावा म्हणून जिओने एसबीआय, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट बँकेसह अन्य दोन बँकांसोबत करार केला आहे. दरम्यान, कंपनीने फोनच्या विक्रीसाठी विव्रेत्यांचीही नियुक्ती केली आहे.


प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या फोनमध्ये खालील फीचर्स असण्याची शक्यता आहे.

– जिओफोन नेक्स्टमध्ये 5.5 इंचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसर मिळेल
– यात 2 जीबी / 3 जीबी रॅम आणि 16 जीबी / 32 जीबी स्टोरेज असेल
– जिओफोन अँड्राइड 11 गो एडिशनसोबत येईल.
– फोनमध्ये Google Camera Go अ‍ॅप मिळेल, जे HDR, Night Mode आणि Snapchat फिल्टरसोबत येईल.
– फोनमध्ये 13 मेगापिक्सल रियर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.
– जिओफोन नेक्स्ट हँडसेटमध्ये ड्यूल सिम कार्ड स्लॉट मिळेल.
– फोनमध्ये 4जी VoLTE सपोर्ट मिळतो.
– पॉवरसाठी यात 2500 एमएएचची बॅटरी दिली जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post