ग्रामसेवकांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत बैठक

  ग्रामसेवकांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत बैठकसन्माननीय एकनाथराव ढाकणे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन 136 च्या वतीने माननीय मंत्री महोदय ग्रामविकास माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची 25 ऑगस्ट 2021 रोजी भेट घेऊन ग्रामसेवकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा व्हावी ही विनंती केली असता तात्काळ माननीय मंत्री महोदयांनी विनंती मान्य करून आज दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी ग्रामसेवक युनियनच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाबरोबर खालील प्रश्नावर यशस्वी चर्चा करून तात्काळ प्रश्न सोडवण्याचे संबंधित ग्रामविकास सचिव उपसचिव यांना निर्देश दिलेले आहेत.👆👆 अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे व राज्य सचिव प्रशांत जामोदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

👍

   1️⃣ प्रथमतः माननीय मंत्री महोदय यांचे राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने बुके देऊन स्वागत करण्यात आले व चर्चेत वेळ दिल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि राज्याध्यक्ष यांनी चर्चेला सुरुवात करताना ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदाचे एकत्रीकरण करून पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती करावी.या मुद्द्यावर आग्रही भूमिका विशद करून कालबद्ध पदोन्नती मध्ये ग्रामसेवक पदावर पदोन्नतीच्या संधी मध्ये ग्रामसेवकांचे कुंठिता खूप निर्माण झालेल्या आहेत.याकडे माननीय मंत्री महोदय यांचे लक्ष वेधून या दोन्ही पदे एकत्र केल्यावर आहे त्या वेतनावर संरक्षण देऊन समिती गठन होऊन या कमिटीच्या माध्यमातून ग्रामविकास अधिकार्‍यांची वेतनश्रेणी लागू करावी असे आग्रही प्रतिपादन केले यावर मंत्री महोदय यांनी सदर प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे माननीय सचिव महोदय यांना निर्देश देऊन समितीचे गठण तात्काळ करण्यात यावी अशी भूमिका मान्य केली. यावर ग्रामविकास विभागातर्फे समिती गठन आणि फाईल राज्य मंत्री महोदय कार्यालयाकडे आहे.लवकरच याबाबत सत्वर कार्यवाही करण्याचे सुतोवाच केले.

2️⃣ आधुनिक युगामध्ये ऑनलाइन युगामध्ये ग्रामसेवक सक्षम असावा,समर्थ असावा.म्हणून ग्रामसेवकांची शैक्षणिक अहर्ता कोणत्याही शाखेची पदवीधर करावे.याकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधून या मागणी मध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार सरकारला सहन करावा लागणार नाही अशा प्रकारची भूमिका विशद करुन 2017 सालापासून सदर फाईल मंत्रालय स्तरावर या ना त्या कारणाने प्रलंबित आहे.याकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले असता माननीय मंत्री महोदयांनी खास बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव न्याय विभागाकडे सादर करावा व सत्वर कार्यवाही करून शैक्षणिक अहर्ता बदल करण्याचे मान्य केले.

3️⃣ ग्रामसेवक संवर्ग कडे ग्रामविकास विभागाव्यतिरिक्त  अन्य विभागाची कामे ग्रामविकास  विभागाची परवानगी न घेता लादले जातात ती कामे तात्काळ कमी होणे खूप गरजेचे आहे याबाबत माननीय मंत्री महोदयांची युनियनच्यावतीने लक्षवेध करून बाबत शासन निर्णय हार्ड कॉपी मंत्रिमहोदयांना दिले असता त्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त करून सदर कामे कमी करणे बाबत माननीय उपसचिव महोदयांना निर्देश देऊन अतिरिक्त कामासाठी तो अभ्यास गट निर्माण होत आहेत व तात्काळ अभ्यास गट करावा व कामाच्या जबाबदाऱ्या वाटप करून देण्यात याव्यात आणि ग्रामसेवकाकडील  अतिरिक्त कामे कमी होणे बाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले ग्रामसेवक संघटनेचे  वतीने 137 कामांत निवेदन या ठिकाणी सादर करण्यात आलं.

4️⃣ ग्रामपंचायत ग्रामसेवक धोरणानुसार राज्यात पाच हजार ग्रामसेवक पदनिर्मिती बाबत माननीय वित्तमंत्री तथा माननीय नामदार अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेली दोन आगस्ट 2021 ची चर्चा नानाजी देशमुख  कृषी समिती च्या अडीअडचणी याबाबतचे इतिवृत्त माननीय मंत्री महोदय यांना सादर करून लक्षवेध करण्यात आले व नामदार पवार साहेब यांनी पाच हजार रिक्त पदे भरणेबाबत ग्रामसेवक ग्रामविकास विभागाला स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत याचा अनुपालन  सत्वर कार्यवाही व्हावी अशी भूमिका विशद करण्यात आली असता माननीय मंत्री महोदयांनी निवेदनावर शेरा मारुन सदर पदे भरतीबाबत तात्काळ कार्यवाही सुरु करावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत.

5️⃣ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 49 मध्ये सुधारणा होणे बाबत ची भूमिका विशद करण्यात आले ग्रामविकास विभागाच्या योजना अभियाने कमिट्या याकरिता ग्रामसेवक सचिव  राहणेसअधिकृत परवानगी असावी व अन्य विभागाचे सचिव पद संबंधित यंत्रणेच्या कर्मचारी अधिकारी यांच्याकडे देण्यात यावेत याबाबतची स्पष्ट भूमिका स्पष्ट निवेदन माननीय मंत्री महोदय यांना देऊन या अधिवेशनामध्ये याबाबत कायद्यात दुरुस्ती करावी अशी विनंती केली असता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे उपसचिव यांना निर्देश देऊन त्याच्या अधिवेशनामध्ये हा बदल करण्याचे सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल स्पष्ट शब्दात त्यांनी बदल करण्याचे धोरण निश्चित केलेले आहे.

6️⃣ राज्य ग्रामसेवक युनियन युनियनचे महाअधिवेशन घेणेबाबत ची भूमिका विशद केली असता माननीय मंत्री महोदयांनी कोरोना चार प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अधिवेशन घेणे बाबत ची भूमिका सकारात्मक सांगितली मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः या अधिवेशनाला उपस्थित राहून ग्रामसेवकांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा होणेबाबत सूतोवाच केलेले आहे.

 7️⃣ कोरोना कालावधीमध्ये करून कोरोना योध्दा ग्रामसेवक 51 मयत सभासदांच्या मयत ग्रामसेवकांच्या वारसाला विमा कवच देणे बाबत निवेदन दिले असता सदर फाईल वित्त विभागाकडे पाठविण्याचे निर्देश दिले व आर्थिक तरतूद करणे बाबतचे मान्य केले.

8️⃣ केंद्र सरकारचे नवीन पेन्शन धोरण आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नंतर उशिरा नेमणूक झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करावी या बाबतचा न्याय निवाडा ग्रामसेवक यांची भूमिका होत असलेला अन्याय ही बाब माननीय मंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून देऊन तसे निवेदन दिले असता उपसचिव यांना निर्देश देऊन भूमिका तपासून पहावी व याबाबत स्वतंत्रपणे चर्चा स्तव कार्यवाही करावी अशा प्रकारचे भावना व्यक्त केली या निवेदनात समवेत सेंट्रल गव्हर्मेंट भारत सरकार यांच्याकडील पेन्शन विभाग 13 फेब्रुवारी 2020 चे शासन निर्णय परिपत्रक माननीय मंत्री महोदय यांना सादर करण्यात आलेले आहे सदर बाब तपासून घ्यावी पडताळणी करावी असे माननीय उपसचिव वित्त यांना निर्देश दिलेले आहेत नऊ राज्य स्तर आदर्श ग्रामसेवक आणि गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करावा यावर लवकरच निर्णय घेण्याचे मान्य केले आहे व दोन्ही एकत्रित कार्यक्रम घेऊ या अशाप्रकारची भूमिका विशद केली नजीकच्या काळात राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सन्मान सोहळा आपला आनंद द्विगुणित करेल अशा प्रकारची चित्र झालेले आहे.

9️⃣ ग्रामसेवकांना मुख्यालय वास्तव्याची ग्रामसभेच्या ठरावाची अट करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले त्यावर सुद्धा भविष्यात कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर उपाययोजना नक्की करण्यात येईल असे स्पष्टपणे सांगितले. 

🔟 नक्षलग्रस्त आदिवासी भागातील कर्मचार्‍यांना एकस्तर वेतन श्रेणी देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले व त्यावर वित्त विभागाची चर्चा करून निर्णय घ्यावा असे सभेत ठरले मागील वेतन आयोगा पेक्षा आता ग्रामसेवक कर्मचाऱ्यांचे पगार कमी होत आहेत याकडे सरकारचे लक्ष दवेध निवेदन देण्यात आले.

1️⃣1️⃣ भंडारा जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवकांच्या खंड सेवा काळ ब्रेक सेवा काळ शासन नियमानुसार सेवा कायम करणेत यावी अश्या प्रकारचे निवेदन सादर करण्यात आले भंडारा जिल्हा परिषदेला स्पष्ट निर्देश देणेचे मान्य करणेत आले.


   वरिष्ठ प्रश्नावर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सकारात्मक आणि निर्णायक चर्चा झालेली आहे भविष्यात पुढील नजीकचा कालावधी मध्ये मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून फाईल क्लिअर करण्याची भूमिका राज्य संघटनेच्या वतीने घेण्यात येई ल काल मुक्कामी आल्यानंतर पत्रव्यवहार तयार करणे बांधकाम भवन सचिव उपसचिव भेटी घेणे नरेगा अतिरिक्त मुख्य सचिव भेट घेऊन त्यांना निवेदन देणे फळबागा लागवडीबाबत बहिष्कार कायम करणे गावठाण आणि गावठाणाबाहेरील नरेगाच्या कामाबाबत निवेदन सादर करणे लघुसिंचन आर्थिक जनगणनेचे कामाला नकार देणे माननीय पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार महोदय यांच्या कार्यालयात निवेदन सादर करणे माननीय राज्य मंत्री महोदय कार्यालयाला भेट देऊन प्रलंबित फाईलचा पाठपुरावा घेणे ऊसतोड कामगाराचे ओळखपत्र देणेचे कामकाज ग्रामसेवक सवंर्गाला देवु नये अश्या प्रकारचे निवेदन या आदरणीय ना.धंनजय मुंडे  सामाजिक न्यायमंत्री  यांचे कार्यालयात देणेत आले.

   आज सकाळी होणारी अकरा वाजता ची बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या बिझी प्रोग्राम मुळे दुपारी चार वाजता संपन्न होऊन बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.या सभेकरिता मंत्रालयीन सचिव उपसचिव कक्ष अधिकारी उपस्थित होते.माननीय मंत्री महोदय यांचे खाजगी सचिव कार्यासन अधिकारी बैठकीसाठी निमंत्रित होते.राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे,राज्य सचिव प्रशांत जामोदे,राज्य मानद अध्यक्ष भास्करराव जाधव,राज्य प्रसिद्धीप्रमुख बापूसाहेब अहिरे,पुणे विभाग विभागीय सह सचिव आर.डी.पाटील,राज्य संघटक विलासराव खोब्रागडे उपस्थित होते.या सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर आजच्या सभेसाठी यशस्वी भूमिका कायदेशीर बाबी पत्र व्यवहार लेखन शासन निर्णय अभ्यासपूर्ण निवेदन सादर केले व माननीय मंत्री महोदय यांचे राज्याध्यक्ष यांनी आभार मानून सभेची सांगता झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post