राजकारणातील लढाई वैचारिक असावी वैयक्तिक नव्हे

 राजकारणातील लढाई ही वैचारिक असावी वैयक्तिक नव्हे : सुजित झावरे पाटील



पारनेर -तालुक्यातील जाधववाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांचे शुभहस्ते तसेच आझाद ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन २०२०-२१ च्या जिल्हा वार्षिक आर्थिक नियोजनातून जाधववाडी येथे २०.०० लक्ष रु कोल्हापूरी पध्दतीच्या बंधारा मंजूर करण्यात आले आहे. सदर बंधारासाठी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ यांनी सुजित झावरे पाटील यांचेकडे मागणी केली होती अवघ्या सहा महिन्याच्या आत बंधारा मंजूर करण्यात आले. यावेळी नदीजोड प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले. महामहिम राज्यपाल यांचे हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले बद्दल जाधववाडी- राऊतवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले.

यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, तालुक्यात पूर्वी राजकारणातील लढाई ही वैचारिक मुद्दावर चालायची गेले दोन वर्षांपासून राजकारणातील लढाई ही वैचारीक नव्हे तर वैयक्तिक झाली आहे ही बाब समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तालुक्यातील राजकारणात आमचा लढा हा वैचारिक आहे वैयक्तिक नव्हे.   सचिन ठुबे, मा.सरपंच सतीश पिंपरकर, रवींद्र पाडळकर सोपानराव करकंडे, बाळासाहेब दिघे, अशोक राऊत, बाळासाहेब लंके, बन्सी महाराज जाधव, युवराज मोरे, सुभाष दुधाडे, संतोष दिघे, विवेक मोरे, बाळासाहेब सपकाळ, मोमीन भाई, तसेच जाधववाडी - राऊतवाडीचे सरपंच विठ्ठल जाधव, उपसरपंच उषाताई जाधव , ग्रामपंचायत सदस्य वैभव जाधव, संतोष जाधव, पोपट सोमवंशी, साळूबाई जाधव, अलका जाधव, पोपट जाधव, पांढुरंग सोमवंशी, रामदास सोमवंशी, शंकर जाधव, योगीता राऊत, पुष्पा राऊत, राणी सुर्यवंशी गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post