सोशल मिडियावर जुळले प्रेमबंध...अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले...

सोशल मिडियावर जुळले प्रेमबंध...अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले... नगर-  सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर जुळलेल्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलिसांनी अहमदनगरजवळील वरवंडे (ता. राहुरी) येथून अटक केली. ऋषिकेश आनंदा जानकर (रा. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची अहमदनगरमधील युवकाशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमसंबंध जुळल्याने ही मुलगी बुधवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता घरातून निघून गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी दुपारी वैभववाडी पोलीस स्थानकात दिली होती.

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी मुलीच्या सोशल मीडियावरील संवादाचा सविस्तर तपशील घेऊन, त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली. तपासात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील ऋषिकेश आनंदा जानकर याने तिचे अपहरण केल्याची माहिती समोर आली. पोलीस पथकाने सोमवारी  नगर येथील वरवंडे येथून ऋषिकेशला अटक केली आणि त्या मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post