नगर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून चर्चा......

 नगर- विधान परिषदेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी इच्छूक उमेदवारांच्या नावाची चर्चा सध्या सुरु झालेली आहे. भाजपाकडून अनेकजण सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छूक असले तरी कार्यकर्त्यांमधून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रा. बेरड यांनी केलेल्या प्रामाणिक कामाचे फळ विधान परिषदेचे तिकिट देऊन द्यावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीला अजून अवधी असला तरी इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. काहींनी तर मतदारांना आपल्याकडे कसे आकर्षित करण्यात येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरु केलेले आहे. काही खास लोकांना पाठवून मतदारांना सहली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काहींनी तर उमेदवारी आपल्यालाच मिळेल, अशी आशा धरलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादी व भाजपाच्या नेत्यांचा समावेश आहे.


मात्र भाजपामध्ये विधान परिषदेसाठी माजी पालकमंत्री राम शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची नावे चर्चेत आहेत. परंतु या सर्वांना पक्षाने अनेक संधी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ऐवजी आता पक्षाशी एकनिष्ठ असलेले व पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे प्रा. भानुदास बेरड यांना आता विधान परिषदेची संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.


भानुदास बेरड यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्षाची जबाबदारी असताना जिल्ह्यात पक्षाचे चांगले संघटन उभे केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची बांधणी चांगली झालेली असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहचलेले असून त्यांनी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाची चांगली फळी निर्माण झालेली आहे.


बेरड यांनी केलेल्या कामाचे फळ आता पक्षाने त्यांना द्यावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तशा आशयाचा पोस्ट आता काहीजण सोशल मीडियावर टाकून पक्षाच्या नेत्यांच्या ही बाब निदर्शनात आणून देत आहे. बेरड यांनाच पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, यासाठी समर्थन केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post