गुरुमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निवड जाहीर

 गुरुमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अंजली मुळे

अवचरे कार्यकारी अध्यक्षा, रंधवे कार्याध्यक्षा तर सुंबे सरचिटणीस
     नगर -  जिल्हा गुरुमाऊली महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी अंजली मुळे, कार्यकारी अध्यक्षपदी मीनाक्षी अवजारे, कार्याध्यक्षपदी छाया रंधवे, तर सरचिटणीसपदी वनिता सुंबे-पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

     महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा संघाचे नेते बापूसाहेब तांबे, जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक बँकेचे चेअरमन सलीम खान पठाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्युल्लता आढाव, बँकेचे माजी चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, व्हाईस चेअरमन बाबा खरात, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे, संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब सरोदे, राजेंद्र सदगीर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत मावळत्या जिल्हाध्यक्ष व नूतन राज्य प्रतिनिधी विद्युल्लता आढाव यांनी जिल्हा महिला आघाडीची नवीन कार्यकारिणी घोषित केली.

     अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली महिला आघाडीच्या नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे : जिल्हाध्यक्षा -अंजली मुळे (संगमनेर), कार्यकारी अध्यक्षा - मीनाक्षी अवजारे (नेवासा), कार्याध्यक्षा - छाया रंधवे (श्रीरामपूर), सरचिटणीस-वनिता सुंबे - पवार (पारनेर), कोषाध्यक्षा - शुभांगी निकम (पारनेर), कार्या.चिटणीस - प्रतिभा राऊत (कोपरगाव), सुनीता कोरडे (नगर), वसुंधरा जगताप (श्रीगोंदा), राज्य प्रतिनिधी - विद्युलता आढाव (कोपरगाव), मीना जाधव (अकोले), संगीता कुरकुटे (राहुरी), सुवर्णा भालसिंग (नेवासा),

     दक्षिण जिल्हाप्रमुख - छाया जाधव (जामखेड), उत्तर जिल्हाप्रमुख - मंगला कलगुंडे (राहुरी), प्रसिद्धीप्रमुख - शोभा ठुबे, कविता गुजर, ज्योती दुशिंग, उपाध्यक्ष - राजश्री कथले (संगमनेर), जयश्री शिंदे (श्रीगोंदा), अंजली भिंगारकर (नगर), आस्मा अ. रज्जाक पटेल (श्रीरामपूर-नपा), समीना फय्याज शेख (राहुरी), मदिना शैख, अर्चना दंडवते, सहचिटणीस - शैख फरजाना अब्दुल गनी, पौर्णिमा गोर्डे, सविता दिवेकर (संगमनेर), सविता भोसले, संगिता शेरकर, मंगल रांधवण, सुरेखा बांदल.

     ऑडिटर - सुरेखा उगले (कोपरगाव),मंजूश्री वाळूंज (पारनेर), वर्षा दरवडे (कोपरगाव), सल्लागार - शारदा ढमक (संगमनेर), सीमा सोनी (कोपरगाव), उषाताई निकाळे (राहाता), मंगला गवळी (राहुरी), शोभा कांबळे (जामखेड),

साधना मंडलिक (अकोले), सदस्या - सविता अष्टेकर, ज्योती राऊत.

     शेवटी अर्चना सिनारे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post