गुलाब चक्रीवादळ पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

 गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारामुंबई : गुलाब चक्रीवादळ काल संध्याकाळी  उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण उडीशामधील कलिंगपट्टणम ते गोपाळपूरमध्ये धडकल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे आणि हे चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत झाले आहे. दरम्यान, हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे पुढे सरकत असल्यानं पुढील दोन ते तीन दिवस धुवांधार पावसाची शक्यता आहे. 

 आज विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात आजसाठी चारही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ह्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापसाचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post