ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरीचा प्रयत्न फसला...नगर जिल्ह्यातील घटना...व्हिडिओ

 ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरीचा प्रयत्न फसला बुधवार 22/09/2021 रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील सौंदाळा ता. नेवासा जिल्हा अहमदनगर गावात रात्री 10:50 वाजता 2-3 चोर दरोड्याच्या( घरफोडी ) उद्देशाने श्री दत्तात्रय विनायक आरगडे यांच्या घरी आले आहेत हे  कळताच सौंदळा गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री शरद आरगडे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला   माहिती कळवली, त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले, संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे चोरांच्या लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आणि पुढील अनर्थ टळला..

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post