सोने-चांदी गडगडले ; सहा महिन्यांतील सर्वात कमी दर

सोने-चांदी गडगडले ; सहा महिन्यांतील सर्वात कमी दर मुंबई : कमॉडिटी बाजारात आज मंगळवारी सोने आणि चांदीवर नफावसुलीचा दबाव दिसून आला. आज सोने दरात १४९ रुपयांची घसरण झाली असून प्रती १० ग्रॅमचा भाव ४५९२० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. मागील सहा महिन्यातील सोन्याचा हा नीचांकी स्तर आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत देखील २५९ रुपयांची घसरण झाली आहे.

 याआधी सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली होती. काल एमसीएक्सवर बाजार बंद होताना सोन्याचा भाव पुन्हा ४६०७१ वर स्थिरावला. त्यात ७६ रुपयांची वाढ झाली. तर चांदी ६५० रुपयांनी वधारून ६०६०५ रुपयांवर बंद झाली.

 

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४५९३० रुपये आहे. त्यात १३९ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४५९२० रुपयांपर्यंत खाली गेला होता. एक किलो चांदीचा भाव ६०४७० रुपये आहे. त्यात १६४ रुपयांची घसरण झाली आहे. त्याआधी चांदीने ६०३३९ रुपयांची नीच्चांकी पातळी गाठली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post