नगर जिल्ह्यातील या लोकनियुक्त सरपंचांचे पद रद्द

 संगमनेर- तालुक्यातील घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर 5 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली होती.सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने या बाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार आज ( ता. 13 ) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार घुलेवाडीच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी 9 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली.ग्रामसभेत ठरावाच्या बाजूने व विरोधात असे दोन्ही मतप्रवाह असल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी मतदान प्रक्रीया राबविली.त्यात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने 1 हजार 184 तर ठरावाच्या विरोधात 1 हजार 15 मते पडली. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्यावरील अविश्‍वास ठराव 169 मतांनी मंजूर झाल्याने त्यांचे सरपंचपद संपुष्टात आले आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post