नगर जिल्ह्यातील घटना अज्ञात व्यक्तीने दोन दुचाकीसह कार जाळली

 नगर जिल्ह्यातील घटना अज्ञात व्यक्तीने दोन दुचाकीसह कार जाळली


संगमनेर -संगमनेर शहरात अज्ञात इसमाने दोन दुचाकीसह एक कार जाळली आहे ही घटना रविवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी पहाटे घडली आहे त्यामुळे आता शहर पोलीसांनी असे कृत्य करणाऱ्या अज्ञात इसमांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होवू लागली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की संगमनेर शहरात सामाजिक कार्यकर्तै संपत गलांडे हे राहात आहे घरासमोरील असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये त्यांनी आपल्या दोन दुचाकी व एक कार लावली होती रविवारी पहाटे अज्ञात इसमाने या दोन्ही दुचाकीसह एक कार जाळली आहे त्यामुळे गलांडे यांचे मोठे नुकसान झाले आहे तर घटनेची माहिती समजताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती दरम्यान दुचाकी जळून गेल्या असून कारचा मागील भाग हा निम्मा जळाला आहे यापूर्वीही अशा पद्धतीच्या घटना शहरात घडल्या आहेत दिवसेंदिवस संगमनेर शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे त्यामुळे अशा पद्धतीने दुचाकीसह कारची जाळपोळ करणाऱ्या अज्ञात इसमांचा पोलीसांनी कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होवू लागली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post