भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदी शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांची वर्णी

भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदी शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांची वर्णी नगर : महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेता नियुक्तीची जबाबदारी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सोपविली होती.  

महापालिकेचे विरोधी पक्षनेता पद संपत बारस्कर यांच्या रूपाने सध्या राष्ट्रवादीकडे होते; परंतु महापालिकेत सत्तांतर झाले. सेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली. मनपातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने विरोधी पक्षनेता पदावर दावा केला होता; परंतु भाजपमध्ये एकमत होत नव्हते. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महेंद्र गंधे यांचे नाव सुचविले असून, तसे पत्र त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सोशल मीडियाद्वारे पाठविले आहे. हे पत्र माजी आमदार कर्डिले शनिवारी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे दाखल करणार आहेत. त्यानंतर महापौरांकडून गंधे यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र देतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post