नेता सुभाष तरुण मंडळाच्या श्रीगणेशाची पोलिस अधिक्षक पाटील यांच्या हस्ते आरती

 नेता सुभाष तरुण मंडळाच्या श्रीगणेशाची पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते आरती

सण-उत्सवात घेतलेली खबरदारी कोरोनामुक्तीकडे नेणारी - जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटीलनगर - कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून गणेशोत्सव हे साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाच्यावतीने घालून दिलेले नियम मंडळांनी, नागरिकांनी पाळणे बंधनकारक आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रांचा अवलंब केल्यास लवकरच आपले शहर कोरोना मुक्त होईल. गणेशोत्सवात तरुणांमध्ये मोठा उत्साह असतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शहरातील बहुतांश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. कोरोनाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे, ही चांगली बाब आहे. या सण-उत्सवाच्या काळात घेतलेली खबरदारी आपणास कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरणार आहे. नेता सुभाष तरुण मंडळाच्यावतीने नियमांचे पालन करत पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा करत आहे, त्याचे अनुकरण इतरांनीही करावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

नेता सुभाष तरुण मंडळाच्या रिद्धी-सिद्धी या पावन श्रीगणेशाची आरती जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, गणेश अष्टेकर, मनोज गुंदेचा, योगिराज गाडे, मदन आढाव, संतोष गेनप्पा, दत्ता जाधव, परेश लोखंडे, सुनिल लालबोंद्रे, मेहुल भंडारी, पारुनाथ ढोकळे, गौरव ढोणे, अंबादास शिंदेे  आदि उपस्थित होते. 

याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, नेता सुभाष तरुण मंडळाला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. स्व.अनिल राठोड यांनी आपल्या कारर्किदीत विविध धार्मिक, पौराणिक, सामाजिक असे भव्य देखावा सादर करुन मोठे नाव मिळवून दिले आहे. सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देऊन मंडळाने नेहमीच जनजागृती केली आहे. आताही मंडळाच्यावतीने शासनाच्या नियमांचे पालन करुन यंदाही मंडळाने साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला आहे. 

याप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचा मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. यावेळी रवि लालबोंद्रे, कैलास शिंदे, गणेश झिंजे, महेश राऊत, गुड्डू भालेराव, प्रणिल शिंदे, गणेश राठोड, पोपट राऊत, अरुण झेंडे, मुन्ना भिंगारदिवे, शरद कोके आदि उत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post