भाजपत गेलेले पण मनाने ‘शिवसैनिक’ असलेले माजी आमदार घरवापसीच्या तयारीत

भाजपत गेलेले पण मनाने ‘शिवसैनिक’ असलेले माजी आमदार घरवापसीच्या तयारीत

 


मुंबई:  मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शिवसेनेत इनकमिंगला सुरुवात झाली आहे.  सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. 2016 मध्ये त्यांनी शिवबंधन सोडून भाजपचे कमळ हातात घेतले होते. मात्र, बऱ्याच काळापासून ते भाजपवर नाराज होते. परिणामी ते भाजपमध्ये कधीच फारसे रमले नाहीत. सुरेश गंभीर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.   


सुरेश गंभीर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. परंतु, मी मनाने अजूनही शिवसैनिक असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. सुरेश गंभीर यांनी 2016 साली शीतल आणि शामल या आपल्या दोन मुलींसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापैकी शीतल गंभीर या सध्या वॉर्ड क्रमांक 182 मधील भाजपच्या नगरसेविका आहेत.  सुरेश गंभीर हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात 1978 साली ते माहीम परिसरातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतरच्या काळात सुरेश गंभीर माहीम मतदासंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून गेले होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post