साथीचे आजार रोखण्यासाठी शहरात ' फाईट टू बाईट' अभियान

 साथीचे आजार रोखण्यासाठी शहरात ' फाईट टू बाईट ॔ अभियान राबविणार

आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेत घेतला साथीच्या आजारांवर उपाययोजनांचा आढावा

अहमदनगर प्रतिनिधी : शहर आणि उपनगरांमध्ये डेंगू. मलेरिया. चिकनगुनिया सह साथीच्या आजारांच्या वेगाने फैलाव होत असून. त्याच बाबत तातडीने उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार किटकजन्य आजारांचा विरोधात शहरात फाईट टु बाईट अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे.

      शहर आणि उपनगरांमध्ये डेंग्यू ,चिकुनगुनिया, मलेरिया, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासंदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी मनपा आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची  तातडीने बैठक घेऊन उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा करत विविध सूचना केल्या. शहरात साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आजारात रुग्णांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. त्यामुळे गोरगरीब रुग्ण घाबरून जातात आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. त्याच्यावर मोठा आर्थिक ताण पडतो त्यामुळे या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी सूचना आमदार जगताप यांनी केली.

     त्यावर आयुक्त गोरे यांनी यासंदर्भात लगेचच उपाययोजना करण्यात येतील औषध फवारणी धूर फवारणी करण्यात येईल डेंगू बाबत   विविध माहिती पोस्टर  ठिकाणी लावण्यात येतील जेणेकरून नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल. डेंगूच्या डासाचे  उपत्ती स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे स्वच्छ पाणी अधिक काळ नागरिकांना साठवून ठेवू नये. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन करण्यात येईल घंटागाडी वर जनजागृतीचे  ध्वनिफीत वाजविणे याबाबत सूचना करण्यात आल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post