किरण काळेंच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले नगर शहरामध्ये जागोजागी फलक

 "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही !", 

किरण काळेंच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले जागोजागी फलक, आमदारांचे कृत्य किळसवाणे - अनंतराव गारदे 



प्रतिनिधी : आयटी पार्कच्या पोलखोल प्रकरणावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल असणाऱ्या शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, अहमदनगर महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, नगर शहर ब्लॉक काँग्रेस, नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेस, नगर शहर उद्योग व वाणिज्य काँग्रेस विभाग आदी विविध फ्रंटल, सेल यांच्यावतीने नगर शहरामध्ये एमआयडीसी आणि विविध ठिकाणी किरण काळे यांच्या समर्थनार्थ "सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही !" असे फलक लावले आहेत. 

या फलकांवरील निषेधाच्या संदेशाची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. "नीच" राजकारण करत खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या "त्यांचा" जाहीर निषेध ! असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे. शहराच्या आमदारांनी नीच राजकारण करत किरण काळे यांनी वास्तव जनतेसमोर आणल्याबद्दल विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फलकावर "त्यांचा" जाहिर निषेध असे लिहीत आमदारांचा निषेध या फलकांवर नोंदविला आहे. 

शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे याबाबत म्हणाले की, किरण काळे हे स्वच्छ आहेत. काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्यांच्या बरोबर आहेत.आयटी पार्कची पोलखोल करताना काँग्रेसची टीम त्यांच्याबरोबर होती त्यावेळी असा कुठलाही प्रकार किरण काळे यांनी केलेला नाही. ते सर्व प्रकारच्या पोलीस कारवाईला तसेच अटकेला देखील सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. मात्र शहराच्या आमदारांच्या या नीच कृत्याची किळस शहरातील जनतेला येत असून असे किळसवाणे कृत्य करणारे लोकप्रतिनिधी शहरासाठी घातक आहेत अशा संतापाचा सूर शहरामध्ये सर्वत्र पाहायला मिळत असल्याचे गारदे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post