करूणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल कोणी ठेवलं? देवेंद्र फडणवीस यांनी केली महत्त्वाची मागणी

करूणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल कोणी ठेवलं? देवेंद्र फडणवीस यांनी केली महत्त्वाची मागणी

 


नागपूर - मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर  आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांचा रविवारचा परळी दौरा वादग्रस्त ठरला.   त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली. सायंकाळी करुणा शर्मांवर ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. याबाबत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

  शर्मा यांच्या  गाडीत पिस्तुल ठेवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलं असून या घटनेची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. 

या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून कुणालाही वंचित ठेवता येणार नाही. तेथे जे काही घडलंय, त्यावरुन कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. हे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, विशेषत: गाडीत पिस्तुल ठेवल्याचा, हे अतिशय गंभीर आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, कुठल्याही दबावाशिवाय चौकशी झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post