आम्हाला लवकरच पुन्हा संधी मिळणार आहे..देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आम्हाला लवकरच पुन्हा संधी मिळणार आहे..देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत बोलताना सूचक विधान केलं आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात फडणवीसांनी हे विधान केलं आहे. 

माथाडी कामगार चळवळीसाठी आमच्या सरकारने सर्व दरवाजे पूर्णपणे उघडे केले होते, असं फडणवीस यावेळी म्हणाले. “माथाडींच्या चळवळीसाठी आमच्या काळात सरकारचे दरवाजे आम्ही पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते”, असं ते म्हणाले.

“या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असतं. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत”, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post