केंद्राच्या कायद्याचा लाभ...निर्बंध असलेल्या ‘या’बँकांच्या खातेदारांना मिळणार 5 लाखापर्यंतची रक्कम

 


नवी दिल्ली:   विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आता ठेवीदारांना २९ नोव्हेंबर २०२१ पूर्वी ठेवींवरील विमा भरपाई पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. 

पीएमसी बँकेप्रमाणे आर्थिक निर्बंध असलेल्या तब्बल २१ बँकांच्या कोट्यवधी ठेवीदारांसाठी आनंदाची बातमी आहे.  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांमधील ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्यासंबंधी खुलासा केला होता. तसेच अडचणीत असलेल्या बँकांच्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरन्टी कॉर्पोरेशन अंतर्गत (डीआयसीजीसी) ठेवीदारांना ५ लाखापर्यंतची रक्कम ९० दिवसांत मिळण्याची हमी दिली होती.


यामध्ये अदूर को ऑप. अर्बन बँक, केरळ, बिदर महिला अर्बन को ऑप बँक, महाराष्ट्र, सिटी को ऑप बँक, महाराष्ट्र, हिंदू को ऑप बँक, पंजाब, कपोल को ऑप बँक , महाराष्ट्र, मराठा सहकारी बँक , महाराष्ट्र, मिलाथ को ऑप बँक , कर्नाटक, 

नीड्स ऑफ लाईफ को ऑप बँक, महाराष्ट्र, 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील बँक, महाराष्ट्र,

 पीपल्स को ऑप बँक कानपुर उत्तरप्रदेश,

 पंजाब अँड महाराष्ट्र को ऑप बँक (पीएमसी बँक) महाराष्ट्र,

 रुपी को-ऑप बँक, महाराष्ट्र, श्री आनंद को-ऑप बँक, महाराष्ट्र, सीकर अर्बन को ऑप बँक, राजस्थान, श्री गुरुराघवेंद्र सहकारी बँक, कर्नाटक, दि मुधोळ को ऑप बँक कर्नाटक, मंथा अर्बन को ऑप बँक, महाराष्ट्र, सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक, महाराष्ट्र, इंडिपेन्डन्स को ऑप बँक नाशिक महाराष्ट्र, डेक्कन अर्बन को ऑप बँक, कर्नाटक, गृह को-ऑप बँक मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post