नगर जिल्ह्यात हळहळ....शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

 नगर जिल्ह्यात हळहळ....शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यूखेळतांना शेततळ्यात उतरलेल्या तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव लगतच्या कान्हेगाव येथे घडली.

या दुदैवी घटनेत चैतन्य अनिल माळी (वय 12), दत्ता अनिल माळी (वय 8) व चैतन्य शाम बर्डे (वय 4) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. ही तीनही मुले गरीब कुटुंबातील असून हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव लगत असलेल्या कान्हेगाव येथील शेततळ्याजवळ चैतन्य माळी, दत्ता बर्डे व चैतन्य बर्डे ही तीन लहान मुले खेळत होती. खेळत असतांना ते शेततळ्याच्या पण्यात उतरली. शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तीघेही पाण्यात बुडून मयत झाली. घटनेची माहिती कळताच त्यांचे कुटुंबिय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तीनही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post