बदली झाली तरी देवरेंच्या अडचणी कायम, 'एसीबी'कडे तक्रार दाखल होणार

 बदली झाली तरी देवरेंच्या अडचणी कायम, 'एसीबी'कडे तक्रार दाखल होणार  नगर :  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली झाली असली तरी त्यांच्या अडचणी कायम राहण्याची चिन्हे आहेत. देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. ॲड. असीम सरोदे आज देवरेंविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप करणारी ज्योती देवरेंची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर मोठे राजकीय नाट्य रंगले होते. आता देवरे यांची जळगाव येथे बदली करण्याचे आदेश निघाले आहेत.

तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, त्यानंतर देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. याबाबतचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. या अहवालात तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post