नगर तालुक्यातील 'या' गावात करोना संसर्ग वाढला प्रशासनाने घेतला हा निर्णय

 टाकळी खातगाव १४ दिवस बंद नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे वीस लोकान कोरोनाची लागण झाली आहे . रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने  टाकळी खातगाव आजपासून चौदा दिवस बंद करण्याचे आदेश  तहसीलदार उमेश पाटील  यांनी दिले . आगामी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता टाकळी खातगाव येथे कॉन्टेन्टमेन्ट झोनची अंमलबजावणी केली. टाकळी येथील गावात जाणाऱ्या रस्ते बंद करण्यात आले आहे. नगर तालुक्याचे गटविकास अधिकारी संजय केदारी, मंडल अधिकारी वैशाली हिरवे,  सरपंच सुनील नरवडे, ग्रामसेवक ज्ञानदेव आडसुरे यांनी गावातील सर्व दुकानें आस्थापना बंद करण्यास सांगितले. तसेच महत्वाच्या कामा व्यतिरिक्त बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post