हृदयाला भिडलेला आणि सर्व फोटोग्राफर्सना नवी दिशा देणारा ठरला CLICK TALK..!!!

 हृदयाला भिडलेला आणि सर्व फोटोग्राफर्सना नवी दिशा देणारा ठरला CLICK TALK..!!!पारंपरिक व्यवसाय करत असताना आजच्या युगात नवीन व्यवसाय, उद्योगाकडे वळणे अनिवार्य बनले आहे. विशेषतः शहरांमधील वाढती गर्दी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील तरूणांनी स्थानिक पातळीवरच नवनवीन उद्योग सुरू केले तर रोजगार निर्मिती बरोबरच ग्रामीण अर्थकारणालाही चालना मिळेल. काही तरी चांगला उद्योग करण्याची जिद्द असलेल्यांसाठी व्यंकटेश फाऊंडेशनने उद्योग क्रांतीच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम सुरू केले आहे

प्रास्ताविकात अभिनाथ शिंदे यांनी सांगितले की, व्यावसायिक व उद्योजकांना सक्षम, समृद्ध करण्यासाठी उद्योग क्रांती चळवळ सुरू केली आहे. यातून नवीन उद्योजक निर्माण होऊन देशाचं अर्थकारण मजबूत होईल असा प्रयत्न आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ही चळवळ योगदान देईल. या नव उद्योजकांना उद्योग क्षेत्रातील मेंटॉर मिळवून देतानाच उद्योग नोंदणी, अर्थसहाय्य मार्गदर्शन, बिझ नेशन ही उद्योगाशी निगडित पुस्तकांची लायब्ररी तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म, डिजिटल मार्केटिंगचे तंत्र व मंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यशस्वी उद्योजक व नवोदित उद्योजक यांना एका व्यासपीठावर आणून अनुभवाचे बोल मिळतील असा उद्योग क्रांतीचा प्रयत्न असणार आहे.  उद्योग सुरू करताना प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. डिजिटल युगात लोकल टू ग्लोबल ही मानसिकता ठेवली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिस्क घ्यायची तयारी व धाडस दाखवले पाहिजे. तरच तुम्ही ध्येय गाठू शकता. 

यावेळी 'श्री योगेश कर्डीले यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील आव्हाने व संधी या विषयी खलील मुद्यावर मार्गदर्शन केले.

➡️कला : फोटोग्राफी एक कला माध्यम. 

➡️निरीक्षण ; पहिले पाऊल :  पाहणे,आस्वाद घेणे आणि त्याला मूर्त स्वरूप देणे.

➡️प्रकाश आणि छाया :  या दोहोंमधील नाते एक कलाकार म्हणून समजून घेताना.आणि त्यांची शक्ती स्वतःच्या माध्यमासाठी पुरेपूर कशी वापरलं? 

➡️व्यवसाय : फोटोग्राफी  एका व्यावसायिक नजरेतून. नेटवर्किंग आणि मार्केटिंग

➡️टीमवर्क आणि अस्तित्व टिकवणे : व्यवसाय वाढविण्यासाठी सहकार्याची भूमिका. वाचन आणि वाचणे. 

➡️ तंत्रज्ञान : तंत्रज्ञानामुळे  जलद गतीने होणारे बदल (अनुकूल आणि प्रतिकूल)

➡️फोटोग्राफीचे भविष्य : कॅमेऱ्याचा आयुष्यातील शिरकाव आणि त्याची गरज ? उत्क्रांती आणि क्रांती ( डीसरप्शन ) या दोन्हीसाठी स्वतःला सज्ज करणे. 

➡️फोटोग्राफीतल बॅड मार्केट  आणि स्टॉक मार्केट :नको तितके चार्जेस कमी करणे, मोफत काम करणे,व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकतात. तुमची जुनी प्रकाशचित्रे आणि इंटरनेट हे तुमची पेन्शन कशी बनू शकते. 

➡️फोटोग्राफीतील दिग्गज : काही विशिष्ट लोकच का प्रसिध्द होतात? त्यांच्या प्रकाशचित्रांमागील कला आणि मेहनत यातून आपण काय धडा घेऊ शकतो?

➡️एक कलाकार म्हणून अस्तित्व : 

तुमच्यातील कला आणि विशेष गुण ओळखून तिचा वापर योग्य रित्या कसा होऊ शकतो ? समाजामध्ये फोटोग्राफरचे योगदान .  या विषयावर व्याख्यान दिले     .

व्यंकटेश फाऊंडेशन संचलित आणि उद्योग क्रांती द्वारा आयोजित या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय फॅशन अँड कमर्शियल फोटोग्राफर श्री. योगेश कर्डीले यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. नगर, पुणे, औरंगाबाद, अंबाजोगाई अशा अनेक शहरातील मिळून जवळ-जवळ ५० फोटोग्राफर्स यात सहभागी झाले होते. यावेळी सुप्रसिद्ध फोटोग्राफर मा. संजय दळवी, रिस्पेक्ट फाउंडेशनचे मा. अभिषेक शेलार, सौ. रागिणी कर्डीले,  JDM DIGITAL PVT. LTD. चे  मा. योगेश भुस्सा व मा.सुरेश मैड, Design Addict Creative Agency चे संचालक, आर्टिस्ट अँड ब्रॅंड कन्सल्टन्ट मा. ज्ञानेश शिंदे , Radio City 91.1 चे मा.धनेश  खत्ती, व्यंकटेश फाउंडेशनचे अध्यक्ष मा. अभिनाथ शिंदे, संचालक मा. व्यंकट देशमुख ,मा. कृष्णा मसुरे, मा .अनिल गुंजाळ,व्यंकटेश  फाउंडेशनचे एमडी मा. ज्ञानेश झांबरे, अँकर शिवानी मनवेलीकर आदी...त्यासोबतच उद्योग क्रांतीचे सर्व सदस्यदेखील उपस्थित होते.आभार ज्ञानेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्योग क्रांती चळवळीच्या अधिक माहितीसाठी व लाभ घेण्यासाठी संपर्क: 9804041111

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post