दरेकर महिलांची माफी मागा अन्यथा थोबाड व गाल रंगवू...राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांचा इशारा

दरेकर महिलांची माफी मागा अन्यथा थोबाड व गाल रंगवू...राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांचा इशारा मुंबई - लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर  यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टिपण्णी केली होती. त्यावरुन, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना इशारा दिला आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असे चाकणकर यांनी म्हटलं आहे. 


चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, त्यांनी प्रवीण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिलाय. दरेकर यांनी पुण्यात शिरूर येथील क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त टिपण्णी केली होती. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरिबांकडे पाहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष' असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. तसेच, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून संताप व्यक्त केला जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post