Breaking...नामदेव राऊत यांनी बांधले ‘घड्याळ’, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले पक्षात स्वागत

 नामदेव राऊत यांनी बांधले ‘घड्याळ’, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले पक्षात स्वागतनगर : कर्जत जामखेड मतदारसंघात आ.रोहित पवार यांनी मोठी राजकीय उलथापालथ केली असून माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे समर्थक असलेले कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत अखेर राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु होती. अखेर आज मुंबईत राउत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ.रोहित पवार उपस्थत होते. राऊत यांचा राष्ट्रवादी प्रवेश माजी मंत्री शिंदे यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. प्रसाद ढोकरीकर यांच्यानंतर राऊत यांनीही भाजपची साथ सोडल्याने राष्ट्रवादीने मतदारसंघात पक्के बांधकाम केल्याचे बोलले जात आहे. आगामी कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजपसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post