ग्रामपंचायत निधीचा अपहार...आजी माजी सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल


ग्रामपंचायत निधीचा अपहार...आजी माजी सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखलश्रीगोंदा:  तालुक्यातील लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या निधीचा वेळोवेळी अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सरपंच सुभाष माने, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर व विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. विस्तार अधिकारी सारीका हराळ यानी याबाबत फिर्याद दाखल केली. हा गुन्हा दाखल व्हावा यासाठी राजू काकडे ,स्वप्नील लाटे, दादा मडके यांच्यासह ग्रामस्थ तहसिल कार्यालया समोर सोमवारी उपोषणाला बसले होते.यानंतर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.


लोणी चौकशीत निर्देशनास आलेल्या आर्थिक, प्रशासकीय अनियमिता, आर्थिक अपहार यास जबाबदार धरून सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे गटविकास अधिकारी यांनी आदेश दिले होते. 2018-19 वर्षांचे लेखा परीक्षण अहवाल ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच माने यानी 14 व्या वित्त आयोग या आराखड्यात समाविष्ट नसलेले काम केले तर विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे यांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर त्यांच्या पदाचा गैरवापर करून लोणी व्यंकनाथ गावातील 14 व्या वित्त आयोगातील कामामध्ये आर्थिक अपहार, प्रशासकीय अनियमीतता व आर्थिक अनियमीतता केल्याचे आढळून आले असल्याने या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post